मंगळवेढा प्रतिनिधी : येताळा खरबडे
दिनांक 18/09/2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार यांना बोगस प्रमाणपत्र देऊन मराठा मुलीची फसवणूक करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्र चालक तथा बोराळे ग्रामपंचायत मधील ऑपरेटर सुहास घोडके याला अटक करा म्हणून दिनांक 18 /9 /2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक सो गटविकास अधिकारी सो पंचायत समिती मंगळवेढा यांना देवदत्त पवार यांनी निवेदन दिले होते त्या अनुषंगाने तहसीलदार साहेब यांनी महा-ई-सेवा केंद्र चालक सुहास घोडके यांचे महा-ई-सेवा केंद्र दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी धनंजय इंगोले तलाठी भारत गायकवाड यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने बोराळे येथील महा-ई-सेवा केंद्र सिल ठोकले व मंगळवेढा तहसीलदार यांच्या आदेशाने दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा येथे सुहास घोडके यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तरी सुहास घोडके याला अटक अटक करावी व गोरगरीब जनतेचे फसवणूक थांबवावी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा