Breaking News

१८ सप्टेंबर २०२३

पायोनियर निवासी गुरुकुल य. मंगेवाडी मध्ये पालक सभा संपन्न...





 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:


खंडोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पायोनियर  निवासी गुरुकुल मध्ये पालक सभा गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर आनंददायी वातावरणात संपन्न झाली.

संस्थापक अध्यक्ष श्री अनिल येलपले सर यांनी इंग्लिश मिडीयम स्कूल सोबतच निवासी गुरुकुल ची स्थापना करून सांगोला सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेणे अधिक प्रभावी व लाभदायक झाले आहे.

       विद्यार्थ्यांनी स्वावलंबी , शिस्तप्रिय , संस्कारक्षम , नैतिक मूल्ये विकसित होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे शारीरिक , मानसिक तसेच बौद्धिक आरोग्य सुस्थितीत राहावे ही संकल्पना घेवून पायोनियर निवासी गुरुकुल ची सुरुवात करण्यात आली होती.पायोनियर गुरुकुल मधील विद्यार्थ्यांकडे पाहून हे उद्दिष्ट साध्य झाल्याची भावना पालक वर्गातून व्यक्त झाली आहे.

        पायोनियर  निवासी गुरुकुल मधील दीनचर्या , संस्कार वर्ग योगा प्राणायाम .कवायती आणि व्यायाम  तसेच निर्जंतुक केलेल्या नैसर्गिक भाज्या आणि चुलीवरी ल भोजन यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राहण्यास मदत होत असल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले. गुरुकुल मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आणि आता सध्याची विद्यार्थ्याची प्रगती पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले 

आहे.

 आजची पालक सभा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभाग प्रमुख श्री आशुतोष रुपनर सर गुरुकुल विभाग प्रमुख श्री अमोल रणदिवे सर , श्री.प्रशांत काटकर सर , सौ.ज्योती रणदिवे मॅडम आणि सौ.दिपाली काटकर मॅडम तसेच गुरुकुल चे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेवून आजची पालक सभा यशस्वी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा