सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
खंडोबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पायोनियर इंग्लिश , सेमी इंग्लिश मिडीयम आणि पायोनियर गुरुकुल य. मंगेवाडी शाळेत पालक सभा खेळीमेळीत संपन्न झाली.
केजी ते इयत्ता १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रत्यक्ष वर्गाला भेट देवून शिक्षकाच्या अध्यापन पद्धतीची पाहणी करून प्रगतीपुस्तक पाहिले.
यावेळी पालकांनी शाळेच्या पायाभूत सुविधांची पाहणी केली.तसेच क्रीडांगण , संगणक विभाग , मेस व वसतिगृहाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच पालकांच्या काही सूचना देखील नोंद करून घेतल्या. शिक्षक व विद्यार्थी यांचे आपुलकीचे नाते पाहून सर्व पालक भारावून गेले.
पायोनियर शाळेच्या विद्यार्थ्यांची शिस्त तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती पाहून सर्व पालकांनी शाळेचे प्राचार्य श्री.अनिल येलपले सर आणि इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
आजची पालक सभा प्राचार्य श्री अनिल येलपले सर यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग विभाग प्रमुख सौ.सुनीता रुपनर मॅडम , केजी विभाग प्रमुख सौ.वैशाली येलपले मॅडम प्राथमिक विभाग प्रमुख श्रीमती राऊत मॅडम , माध्यमिक विभाग प्रमुख श्री आशुतोष रुपनर सर आणि श्री. प्रवीण कोरे सर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पालक सभा यशस्वी झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा