Breaking News

१९ फेब्रुवारी २०२३

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या वतीने वाणीचिंचाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न....

 





छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत वाणी चिंचाळे येथे  नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने मोफत ई आयुष्यमान (गोल्डन कार्ड )वाटप शिबिर आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी माजी उपसरपंच बापूद्दीन शेख, सरपंच जितेंद्र गडहिरे, ग्रामसेवक सुनील साळुंखे भाऊसाहेब, उपसरपंच नामदेव घुणे, कैलास गडहिरे, ज्येष्ठ नेते गुलाब दाजी गडहिरे ,विनोद गडहिरे, पत्रकार सचिन गायकवाड, कार्यक्रमाचे आयोजक रघुनाथ गायकवाड ,यांनी भाषणे केली .त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सहाय्यक पी. एस .कोळी प्राथमिक आरोग्य केंद्र घेरडी व आरोग्य सेवक सुभाष नाना बनसोडे यांनी आयुष्यमान भारत या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिसचे पदाधिकारी सुरज खरात ,,अमर खरात सुशांत बनसोडे ,प्रशांत गडहिरे, दादा काशीद ,अभिजीत गडहिरे या संघटनेचे सर्व नेते यांनी मेहनत घेतली व मार्गदर्शक तालुका समन्वयक नागेशजी बनसोडे साहेब यांचे चांगले सहकार्य व साथ मिळाले या सर्वांचे आभार नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस सांगोला तालुका उपाध्यक्ष व वाणीचिंचाळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गडहिरे यांनी मांडले व शिवजयंती उत्सव आनंदात व उत्साहात साजरा केला. या सदरच्या कार्यक्रमाला वाणि चिंचाळे  येथील ग्रामस्थांनी भरपूर प्रतिसाद दिला व संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा