प्रतिनिधी - संतोष कदम.
निरवांगी :- ( ता. इंदापूर ) रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्य विद्यालय निरवांगी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी भगव्या पताका लेझीम पथक आणि काही मुलींनी साड्या परिधान करून घोषणा दिल्या.
कार्यक्रमात प्रथम अध्यक्षांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉ. हणमंतराव संपतराव पोळ पाटील सर यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव माननीय पांडुरंग भानुदास पाटील माजी मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रथमता व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आपले मनोगते,गीते आणि पोवाडे सादर करण्यात आले . मुलींची उत्कृष्ट भाषणे झाली .
शेवटी माननीय अध्यक्ष डॉ.हणमंत संपतराव पोळ सर यांनी आपले मौलिक विचार व्यक्त केले. ते म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार सध्याच्या युगात राबवण्याचे गरज आहे . प्रत्येक नागरिकांनी इतिहास वाचून आत्मसात करावा. छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श मॅनेजमेंट गुरु होते . त्यांनी इतर होऊन गेलेले राजे यांच्यातील फरक सोप्या भाषेत सांगितला. स्त्रियांविषयी आदर किती होता हे उदाहरण देऊन सांगितले आणि शेवटी सर्व विद्यार्थ्यांसाठी खाऊ साठी पैसे दिले .
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरसट सर यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोथेरे सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा