Breaking News

चैतन्य विद्यालय व सुधाकर गोंविद महाविद्यालय नीरा नरसिंहपुर येथे इयत्ता दहावी आणी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम अतिशय छान आणी आनंदी वातावरणात पार पडला...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

 नीरा - नरसिंहपुर :- ( ता. इंदापूर  ) चैतन्य विद्यालय निरा नरसिंहपुर  येथील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमांमध्ये विविध शिक्षक आणि विद्यार्थी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष हे ह.भ.प.अंकुश तात्या रणखांबे हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हे लक्ष्मी नरसिंह देवस्थानचे विश्वस्त व शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रमोद दंडवते,शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मगनदास क्षीरसागर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, इंदापूर पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ सरवदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद विद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य गोरख लोखंडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या  कार्यक्रमाला कुंभार सर, तोडकर सर,  लावंड सर, पवळ सर,घाडगे सर,देशपांडे सर , नंदकुमार पाटील सर, अनंत पाटील सर,  बोरदे सर, खारतोडे सर, खटके सर, दुनाखे मॅडम आणि निकते मॅडम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दोन फॅन,एक शाळेच्या नावाचा बोर्ड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा वस्तू भेट म्हणून दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना अल्पोपहार देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत