प्रतिनिधी - संतोष कदम .
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) रविवार दिनांक 22 जानेवारी रोजी निरा - नरसिंहपुर येथे पत्रकार संरक्षण समिती तालुका इंदापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमामध्ये गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार , ग्रामसेवक , आरोग्य सेवक, विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये इंदापूर तालुका व महाराष्ट्र मधून आलेल्या दीडशेहून अधिक पत्रकारांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब चे उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे सर यांचा सत्कार माजी राज्यमंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे मामा व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य बापूसाहेब देहूकर यांच्या हस्ते करण्यात आला.
उखळमाळ येथील रहिवासी असलेले अत्यंत प्रतिकूल, खडतर परिस्थिती वरती मात करत उच्च पदापर्यंत पोहोचलेले माझे गुरुवर्य डॉ. कांबळे सर ज्यांनी मला अकाउंट विषय शिकवला त्यांचा सत्कार आपण केला. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. असे गौरउद् गार माजी राज्यमंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे मामा यांनी काढले.
पुढे ते म्हणाले, पत्रकारांनी विषयाचे भान ठेवून पत्रकारिता केली पाहिजे, जो जनसेवक खऱ्या अर्थाने कार्य करतो त्याच्या कामाबाबत दखल घेऊन सत्याची कास धरली पाहिजे, सत्य समोर आणण्याचे काम केले पाहिजे, तळागाळातील लोकांची कामे झाली पाहिजेत आदी विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष जेष्ठ पत्रकार नाथाभाऊ उंद्रे , समितीचे कार्याध्यक्ष रवींद्र खुडे, समितीचे कायदा सल्लागार ॲड. संतोष शिंदे ( मुंबई हायकोर्ट ) , पुणे जिल्हा न्यायालयाचे निवृत्त हेड बेलिफ पंढरीनाथ खुडे, ह्यूमन राइट संघटन दिल्लीचे अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे , जिल्हा वैद्यकीय सल्लागार डॉ. मोहन वाघ , पोलीस मित्र संघटनेचे प्रा. सुरेश वाळेकर , गाडगे महाराज मराठा धर्मशाळा ट्रस्ट पंढरपूरचे विश्वस्त राघेश बादले पा. संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, हरिभाऊ घोगरे,ह.भ.प. महेश सुतार महाराज, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर बोराटे, पत्रकार संरक्षण समिती इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सुतार, तालुका कार्याध्यक्ष डॉ. सिद्धार्थ सरवदे , तालुका उपाध्यक्ष धनाजी शेंडगे, सचिव सतीश जगताप यांच्यासह सर्व सदस्य पदाधिकारी तसेच इंदापूर, माळशिरस, माढा, पंढरपूर, बारामती, हवेली, दौंड तालुक्यातील पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी- माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा