अजनाळे: सचिन धांडोरे:
काल गुरुवार दि २ फेब्रुवारी २०२३ रोजी साय ७ वाजता आमदार आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत आ.शाहाजीबापु पाटील यांनी अजनाळे येथे भेट दिली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा आ दिपक आबा साळुंखे पाटील,नायब तहसीलदार किरण बडवे,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर,तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, अभियंता कमळे, अभियंता मुलगीर,सरपंच सुजाताताई देशमुख, उपसरपंच अर्जुन येलपले, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले,आनंद पवार,सचिन आटपाडकर, पशुवैद्यकीय अधिकारी गोतसूर्य, ग्रामसेवक संदीप सरगर, मंडलाधिकारी दादा गांवधरे यांच्या विविध शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
पुढे बोलताना अँड आ.शाहाजीबापु पाटील म्हणाले की, अजनाळे गावातील विविध रस्त्याच्या कामांना लाखो रुपये निधी देऊन या भागातील बऱ्याच रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत कै.आ काकासाहेब साळुंखे पाटील,कै आ गणपतरावजी देशमुख यांनी या तालुक्याचे राजकारण पाणी प्रश्नावर केले आहे. गावाचा विकास करताना कोणीही पक्ष पार्टी मत भेद विसरून गावाचा विकास केला पाहिजे गावाच्या विकासामध्ये कोणीही राजकारण आणू नये या गावाला टेंभू, निरा, उजनीचे पाणी मिळाल्यामुळे या गावाला त्याचा शेतीला निश्चितपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही या तालुक्यातील विज,रस्ता पाणी या गोष्टी देण्यासाठी मी व दीपक आबा साळुंखे पाटील प्रामाणिकपणे आम्ही दोघे प्रयत्न करणार आहे.
मा आ.दिपक आबा साळुंखे पाटील आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, आमदार आपल्या दारी हा दौरा मी व आमदार शहाजी बापू पाटील तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी घेऊन हा गाव भेट दौरा आयोजित केला आहे.कोरोनाचा काळ असताना देखिल २५ कोटी मंजूर करून रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत अजनाळे गाव हे १०० टक्के रोजगार हमिच्या कामावर जाणारे हे गाव आहे.डाळिंबाचे पिक उध्वस्त झाल्यामुळे या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाले आहे त्यामुळे नँशनल बँका सिबिल स्कोर चांगला असेल तरच कर्ज देतात परंतु शेतकऱ्यांची सिबिल खराब असल्यामुळे नँशनल बँका कर्ज देत नाहीत तरी सिबिल ही जाचक अट्ट रद्द करावी या साठी आ शाहाजीबापु व मी निश्चितपणे प्रयत्न करून काहीतरी मार्ग काढला जाईल. या वेळी कुंडलिक कोळवले,विजय येलपले,सागर कदम,मधुकर पुजारी,संदिप कुरे,भारत येलपले,महोन येलपले आदी शेतकऱ्यांनी आपल्या समस्याचा आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासमोर पाडा वाचला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन येलपले यांनी मानले.
======================================
चौकट : अँड आ शाहाजीबापु पाटील यांनी गाव भेट दौऱ्यात दिवाणमळा अंगणवाडी इमारत बांधणे ,लिगाडेवाडी अंगणवाडी इमारत बांधने या दोन अंगणवाडी साठी २३ लाख रू गाव भेट दौऱ्यातच मंजूर केले आहेत.त्याच बरोबर गावातील वाड्यावर जाणाऱ्या रस्त्यानां ही बापूंनी अनेक रस्त्यांना लाखो रुपये निधी मंजूर केला आहे.
======================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा