Breaking News
३० जानेवारी २०२३
पायोनियरच्या प्रतीक्षा येलपलेची गगन भरारी; गोळा फेक स्पर्धेत राज्यात दुसरी
अजनाळे: दि.२९ जानेवारी. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल, पायोनियर सेमी इंग्लिश स्कूल व पायोनियर गुरुकुल ची विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा दत्तात्रेय येलपले हिने १७ वर्षे वयोगटाखालील स्पर्धेमध्ये राज्यांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. अतिशय जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम याच्या जोरावर प्रतिक्षाने हे यश आपल्या बाजूने खेचून घेतले. तिच्या यशाबद्दल राज्यभरातून प्रतिक्षा वरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामध्ये तिचे वडील श्री. दत्तात्रय येलपले यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल येलपले क्रीडा शिक्षक श्री. घाडगे सर व क्रीडा मार्गदर्शक श्री. चेतन सर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतिक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून प्रतिक्षा चे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर यलमार मंगेवाडी परिसर, आजी-माजी सरपंच व सर्व मान्यवरांकडून प्रतिक्षाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तालुका व जिल्ह्यातून प्रतिक्षा वरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे. राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी तिला प्राप्त झाली आहे. त्यामुळे तिच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा