Breaking News

०४ फेब्रुवारी २०२३

माजी जिल्हा परिषद सदस्य संगम(आप्पा) धांडोरे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समिती सदस्य पदी निवड.....


 अजनाळे:सचिन धांडोरे: स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांचे विश्वासू माजी जिल्हा परिषद सदस्य संगम धांडोरे यांची  भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समिती सदस्य पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती कार्यालयीन चिटणीस भाई अँड राजेंद्र कोरडे यांनी दिली.

संगम धांडोरे हे राजकारणात भारतीय शेतकरी कामगार पक्षात सन ८३  सालापासुन सक्रिय आहेत. अजनाळे ग्रामपंचायत सदस्य म्हणून सन १९८९ ते १९९५ पर्यंत काम पाहिले तसेच  तसेच  अजनाळे गावचे सरपंच म्हणून २००० साली ते २००५ पर्यंत काम पाहीले तर जिल्हा परिषद सदस्य म्हणुन २००७ साली चोपडी जिल्हा परिषद गटातुन काम पाहिले तसेच त्यांच्या सौभाग्यवती संगिताताई धांडोरे यांनी कडलास जिल्हा परिषद गटातुन सन २०१७ साली निवडणुक लढवुन १४ जानेवारी २०२०ते २०२२ पर्यंत रोजी  सोलापुर जिल्हा समाज कल्याण सभापती म्हणुन काम पाहीले. सोलापूर जिल्हा समाज कल्याण सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन दलित वसत्यामधील कामे,गटारी,रस्ते या भरघोस निधी देवुन सोलापूर जिल्ह्यात आपल्या नावाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.त्यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षात केलेल्या कार्याची दखल घेऊन  व  स्वर्गीय माजी आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्याईने त्यांना या पदापर्यंत गवसणी घातली आली असल्याचे संगम धांडोरे यांनी सांगितले. त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सामाजिक राजकीय स्तरातून अभिनंदन केले जात आहे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा