प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) शालेय परिसरातील झाडांना विद्यार्थ्यांनी आकर्षक व कलात्मक पद्धतीने रंगकाम केले.
श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय, वालचंदनगर मधील प्राचार्य श्री चंद्रकांत कांबळे सर,कला शिक्षक श्री अतुल अभिमन्यू गायकवाड, उप मुख्याध्यापक श्री बाळासाहेब पडारी सर व पर्यवेक्षक श्री काशिनाथ हिरवे सर व माणिक पिसे सर याच्या कल्पनेमधून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम कला शिक्षक श्री अतुल अभिमन्यू गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये यशस्वी पणे राबवण्यात आला.
शाळा समितीचे अध्यक्ष श्री मकरंद वाघ सर व उपाध्यक्ष श्री प्रशांत महामुनी सर सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा