Breaking News

०३ मार्च २०२३

श्री वर्धमान विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा...


 प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर : - ( ता. इंदापूर ) येथील श्री वर्धमान विद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधुन विद्यालयाचे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य चंद्रकांत कांबळे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी व जेष्ठ शिक्षिका अश्विंदर घुले यांचे हस्ते सरस्वती पूजन व  दिपप्रज्वलन तसेच कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आला.  प्रास्ताविकातून उपमुख्याध्यापक पडारी यांनी मराठी भाषेची महती विषद केली. अध्यक्ष म्हणून बोलताना प्रभारी प्राचार्य कांबळे यांनी मराठी राजभाषा दिन का साजरा केला जातो याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिक्षक मनोगतात मल्हारी माने यांनी मराठी भाषेचे विविध पैलू सांगितले. विद्यार्थी मनोगतात कु.प्रणिता पिंपरे व अनुराग फडतरे मराठी राजभाषा विषयावर विचार मांडले. कु.प्रांजल आठवले हीने मराठी भाषेवर पोवाडा सादर केला. प्रमुख पाहुण्या अश्विंदर घुले यांनी मनोगतात मराठी भाषेचा इतिहास विषद केला. इ.आठवीच्या विद्यार्थ्यांनी समुह गीत सादर केले. 

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.ऋतुजा शिंदे व कु.प्रज्ञा कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, माणिक पिसे,अपर्णा  चौधरी, सुचिरता पडतुरे, श्रीमती शेंडगे, माधुरी सूर्यवंशी, भारत पाटील व रावसाहेब वीरकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. विजयसिंह पाटील, प्रमोद गायकवाड व पंकज पाटील यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आभारप्रदर्शन अश्विनी पांढरपट्टे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा