Breaking News

०८ जानेवारी २०२३

दीपगंगा भगीरथी राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार अजनाळे येथील गिरिधर इंगोले यांना जाहीर...


 अजनाळे: सचिन धांडोरे: दीपगंगा भगीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त  दिला जाणारा दीपगंगा भगीरथी राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार अजनाळे येथिल गिरीधर इंगोले यांना नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक समाजसेवक तथा दीपगंगा भगीरथी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक लोंढे यांनी दिली.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३रोजी साय ४ वाजता  कोराची इचलकरंजी जि कोल्हापूर येथे नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या शारदा वृद्ध  सेवाश्रम पहिल्या शाखेच्या अविस्मरणीय उद्घाटन सोहळ्यात हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.गिरिधर इंगोले यांना या आधी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, पुरस्कार देऊन विविध संस्थेने गौरवले आहे. त्यांच्या या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा