Breaking News

०७ जानेवारी २०२३

वाणी चिंचाळे येथे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान...


 अजनाळे:वाणी चिंचाळे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांचा समाजकारणाचा विचार जपत आम्ही त्यांचे विचारांचे पालन करून निरू भैय्या युथ फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  यांनी रक्तदान शिबिर आयोजन करून वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रतिनिधी जितेंद्र गडहिरे यांनी केले कार्यक्रमास माजी सरपंच लक्ष्मण निळे, बाबुराव सोपे, गुलाब गडहिरे ,राजेंद्र पवार, मोहन झाडबुके,कैलास गडहिरे,  दादासाहेब घुणे, बंडू सोपे, लक्ष्मण पाटील ,विठ्ठल पवार, प्रशांत गडहिरे,राहुल गडहिरे, अतुल गडहिरे ,बंडू लांडगे ,दादा काशीद व  अनेक कार्यकर्त्यांच्या  उपस्थितीत पार पडले. 

युवा नेते यश राजे साळुंखे पाटील यांनी कार्यक्रमास धावती भेट दिली तेव्हा त्यांनी फाउंडेशनचे काम सामाजिक बदलाचे आहे तसेच कौतुकास्पद आहे सर्व कार्यकर्त्यांना शाब्बासकीची थाप देऊन असे चांगले काम आपण करत राहावे असे म्हणाले.

रक्तदान शिबिरा दरम्यान निरु भैय्या युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन गडहिरे यांनी सामाजिक बदलाची सुरुवात स्वतः रक्तदान करून केले फाऊंडेशन आबांच्या विचारांचे पालन करून विधायक कामासाठी व गोरगरिबांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. रक्तदान शिबिरास 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून आबांना शुभेच्छा दिल्या.

रक्तदान शिबिर पार पडण्याकरता रेवनिंग ब्लड बँक सांगोला यांचे सहकार्य लाभले अशी माहिती निरंजन गडहिरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा