Breaking News

०७ जानेवारी २०२३

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवले पाहिजे; प्रकाश सोळसे

अजनाळे: विदयार्थ्यांनी अभ्यासाबरोबर विविध क्रिडा स्पर्धेत प्राविण्य मिळवले पाहिजे असे प्रतिपादन महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश सोळसे यांनी व्यक्त केले.

काल गुरूवार दि ५ जानेवारी रोजी अभिनव पब्लिक स्कुल मधिल   शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवित यश संपादन केलेल्या अनिकेत  कोळवले, श्रेया  जाधव ,क्रितिका येलपले, शमिका कोळवले, या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी लाडे,मुख्याध्यापिका कावेरी लाडे,पत्रकार सचिन धांडोरे, साधु कोळवले, आशोक विटेवर यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते.

पुढे बोलताना सोळसे म्हणाले की,अभिनव पब्लिक स्कुल ने अगदी चार -पाच वर्षाच्या काळामध्ये विदयार्थ्यांना विविध स्पर्धेमध्ये सहभागी करून जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पर्यंत मजल मारली आहे. शिवाजी लाडे सर व कावेरी लाडे मँडम यांनी आतोनात परिश्रम घेवुन ग्रामिण भागामध्ये चांगला दबदबा निर्माण केला आहे.  या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते...

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा