प्रतिनिधी - संतोष कदम.
निरवांगी :- ( ता. इंदापूर ) पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय, निरवांगी येथे 74 वा प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8.15 वाजता विद्यालयातील ध्वजारोहण नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी, निरवांगी चे संस्थापक -अध्यक्ष मा. प्रा. डॉ. हणमंतराव संपतराव पोळ यांच्या हस्ते झाले,
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी हायस्कूलचे आणि प्राथमिक शाळेचे विद्यार्थी यांची मनोगते झाली, तसेच देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली, यामध्ये गीत आणि नृत्य यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी मा. प्रा.डॉ. हणमंतराव पोळ सर यांनी आपले विचार व्यक्त केले, ते म्हणाले, भारतीय राज्यघटना किती महत्त्वाची आहे, कायदा कसा तयार होतो, कायदे मंडळ, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. आणि शेवटी मुख्याध्यापक श्री शिरसट सर यांनी सर्वांचे आभार मानले.
संध्याकाळी 6.30 वाजता विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शन यांचे कार्यक्रम सादर करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूर तालुक्याचे आमदार, माजी राज्यमंत्री मा. दत्तात्रय भरणे( मामा) यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वालचंद नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. विक्रम सिंह साळुंखे साहेब उपस्थित होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, निमंत्रित केलेले मान्यवर, सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निमसाखर, दगडवाडी, खोरोची मधील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम मा. श्री आमदार साहेब आणि माननीय श्री साळुंखे साहेब यांच्या हस्ते सरस्वती आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. डॉ. हणमंतराव पोळ सर आणि संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री विठ्ठल पवार यांनी केले.
इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली, यामध्ये नृत्य, गीत गायन, अंध श्रद्धा, महाराष्ट्राची परंपरा यावर आधारित कार्यक्रम होते, यावेळी आमदार साहेब विद्यार्थ्यांमध्ये बसून आणि स्टेजवर सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले, तसेच मार्गदर्शनही केले.
मा.साळुंखे साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून, भविष्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये मोठी ऊर्जा निर्माण झाली. मा.आमदार भरणे मामा यांनी विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेशासाठी 50000 देण्याचे जाहीर केले. संस्थेच्या विकासासाठी विद्यालयातील सेवानिवृत्त 1, मुख्याध्यापक-मा. श्री पांडुरंग भानुदास पाटील,2,शिक्षक मा. श्री अर्जुन तुकाराम पोळ 3, नाईक मा. श्री उत्तम शंकर जाधव यांनी आर्थिक मदत दिली.
मा.आमदार भरणे मामा आणि मा.श्री साळुंखे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन देऊन, भविष्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या,
सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री शिरसट सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख मा. श्री भोंग सर,मा. श्री कोथेरे सर,सौ.भोसले मॅडम यांनी केले. विशेष सहकार्य चव्हाण सर,आघाव सर,गावडे सर, जाधव सर, भागवत पोळ सर,
दनाने मामा,रोकडे मामा,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप मोठी साथ दिली.
शेवटी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा. डॉ.श्री. हणमंतराव पोळ सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि सदर कार्यक्रमाचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा