Breaking News

२९ जानेवारी २०२३

ग्रामसभेत केलेल्या ठरावाला न जुमानता अजनाळे येथिल शेजाळ पाझर तलावामधील बेकायदेशीर पाणी उपसा सुरूच; पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवरती कडक कारवाई करावी गावातील ग्रामस्थांची मागणी...


 ग्रामसभेत केलेल्या ठरावाला न जुमानता अजनाळे येथील शेजाळ पाझर तलावा मधील बेकायदेशीर पाणी उपसा सुरूच; बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यावरती कडक कारवाई करावी ग्रामस्थांची मागणी... 
अजनाळे:सचिन धांडोरे: अजनाळे गावाच्या पिण्याच्या पाण्याची मदार शेजाळ पाझर  तलावाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे अजनाळे ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०२३ रोजी  ग्रामसभेत सर्वानुमते बेकायदेशीर पाणी उपसा बंद करावा यासंदर्भात ठराव  करण्यात आला होता.या  ग्रामसभेच्या ठरावाला न जुमानता शेतकरी दिवसा ढवळ्या बेकायदेशीर पाणी उपसा चालू आहे. बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवरती कडक कायदेशीर कारवाई करावी  अशी मागणी विष्णू देशमुख यांनी केली आहे.
शेजाळ पाझर तलावामध्ये ८ ते १० शेतकऱ्यांनी विना परवाना  विद्युत मोटार टाकून बेकायदेशीर पाणी उपसा मोठ्या प्रमाणात चालू केला आहे या  शेतकऱ्यांनी वेळीच बेकायदेशीर पाणी उपसा बंद केला नाही तर अजनाळे गावाला पाणीटंचाईला सामोर जावे लागणार आहे. उन्हाळ्याची चाहुल लागल्याने गावाला पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे.परंतु काही  शेतकऱ्यांनी तलावाच्या पाण्यावर नजर ठेवून बेसुमार पाणी उपसा चालु केला आहे. गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेत सरपंच यांनी पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना तोंडी व लेखी सूचना देऊन देखील या  सुचनांना न जुमानता " हम करो सो कायदा " या प्रमाणे वागत आहे.
 सध्याच्या परिस्थितीमध्ये पाझर तलावामध्ये गावाला एक -दोन महिना  पाणीपुरवठा पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने गावाला पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायती कडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शेतकऱ्यांनी गावाच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून तलाव मधील बेकायदेशीर तात्काळ पाणी उपसा बंद करावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल...

 *जे शेतकरी शेजाळ पाझर  तलावातील बेकायदेशीर पाणी उपसा करत आहेत अशा  शेतकऱ्यांनी तात्काळ पाणी उपसा बंद करून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कोणत्याही शेतकऱ्याची गय केली जाणार नाही*

ग्रामसेवक संदीप सरगर आजनाळे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा