प्रतिनिधी - संतोष कदम.
शेळगाव :- ता. इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन पुणे जिल्हा पुर्व चे जिल्हा अध्यक्ष मा. राज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना राज कुमार म्हणाले इंदापूर तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये शाखांच्या माध्यमातून बूथबांधणी पक्की होईल व बूथ बांधण्याच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये पक्ष संघटन मजबूत होईल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज साबळे यांनी केले तसेच आभार बाळासाहेब जाधव यांनी केले कार्यक्रमास जिल्ह्याचे महासचिव नवनाथ गायकवाड, ॲड. वैभव कांबळे, सतीश साळवे, सुजय रणदिवे, गोविंद कांबळे, रेवननाथ वेताळ, मनोज साबळे, ॲड. बापू साबळे, विकी मिसाळ, संजय धिमधीमे, सुनील केंगार, राहुल कांबळे, किरण मिसाळ, शब्बीरभाई हनीफ सय्यद, शेवंता भोसले, छगन पाटील इत्यादी उपस्थित होते तसेच शेळगाव शाखेचे अध्यक्ष सिद्धार्थ परधे, उपाध्यक्ष अमोल जाधव, मुस्लिम अल्पसंख्यांक अध्यक्ष रमजान सय्यद, सचिव अमर जाधव, सहसचिव नाथा पारदे, कार्याध्यक्ष रमेश जाधव, सहकार्याध्यक्ष बाजीराव कदम, संघटक युवराज जाधव, सहसंघटक राहुल जाधव, विद्यार्थी संघटक पंचम जाधव, मार्गदर्शक मोहन जाधव, संपर्कप्रमुख अमोल चव्हाण, प्रसिद्ध प्रमुख शामराव जाधव, कायदेशीर सल्लागार ॲड. अक्षय जाधव, संघटक प्रवक्ता नितीन जाधव, सह मार्गदर्शक बुद्धम जाधव, तसेच शेळगाव येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा