Breaking News

२८ जानेवारी २०२३

अभिनव पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा...


 अजनाळे:  अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावर्षीचे ध्वजारोहण अभिनवचा स्कॉलर विद्यार्थी अनिकेत अर्जुन कोळवले यांच्या हस्ते करण्यात आले, ज्याने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती स्पर्धेत राज्यात नववा येण्याचा मान पटकावला आहे. या कार्यक्रमास दिलीप येलपले सर अध्यक्ष म्हणून लाभले. यावेळी संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे सर, मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम,अर्जुन कोळवले, मा. पवार मेजर, विकास येलपले, जनार्दन येलपले, रावसाहेब बाबर, संदीप कुरे, हरीश लाडे, राजू सरगर, संभाजी कोळवले, विशाल पाटील, अमोल येलपले तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

       उपस्थित मान्यवरांचे सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांनी निरनिराळे कवायत प्रात्यक्षिके सादर केली व आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली. निरनिराळ्या स्पर्धा व परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंतांचे सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंडलिक कोळवले यांच्याकडून स्कॉलरशिप मधील यशस्वी विद्यार्थी तसेच अजंठा आर्ट मधील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी यांना प्रत्येकी शंभर रुपये बक्षीस देण्यात आले. रुद्र येलपले याच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट लेझीम आविष्काराने सर्वांची मने जिंकून घेतली. शिक्षक मनोगतात पूजा होटे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासाची माहिती सांगितली.

        अध्यक्षिय भाषणात दिलीप येलपले यांनी विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या गुणात्मक विकासाबद्दल कौतुक केले व स्कूलच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सतीश येलपले यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम तर आभार प्रदर्शन सुजाता पोतदार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा