प्रतिनिधी - संतोष कदम.
शिरसटवाडी :- ( ता. इंदापूर ) जीवन ज्योत अपंग संस्था इंदापूर, ॲड . नितीन कदम मित्र मंडळ शिरसटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आयोजित मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसटवाडी येथे मंगळवार दि. २४ / १ / २०२३ रोजी ठीक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोफत नेत्र रोग तपासणी, शुगर व रक्तदाब, ई.सी.जी. तपासणी, आयुष्यमान भारत ( अ.भा ) कार्ड कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.
शिबीरास भरघोस प्रतिसाद देत बहुसंख्य नागरिकांनी आपली मोफत आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये एकूण १६९ जणांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
या शिबीरामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. प्रणाली भजगवळी ( वैद्यकीय अधिकारी शेळगाव PHC ) , डॉ. चैताली वाघ ( CHO शिरसटवाडी उपकेंद्र ) , प्राजक्ता कोळी ( ANM ) , विक्रम गहेरवार ( MPW ) , सुमन तनपुरे ( ASHA ) , सदाकाळे विजया ( ASHA ),
सविता हगारे ( ASHA ) , मंगल मराठे ( PTA ), यांनी काम पाहिले .
यावेळी शिरसटवाडी गावचे सरपंच जयकुमार रावण, ॲड. नितीन कदम , डॉ. घनश्याम भोसले ( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दलित पॅंथर ), किशोर पवार ( संस्थापक चेअरमन श्री गणेश ग्रामीण सह पतसंस्था ) , संतोष राजगुरू ( मुख्य प्रदेश संघटक सावता परिषद महाराष्ट्र राज्य ), उद्धव त्रिंबक पांढरे ( सचिव गणेश पतसंस्था ), नितीन सुखदेव नरूटे , नामदेव चंद्रभान फलफले , बापूराव दादाराम बल्लाळ , हरिदास रामचंद्र तनपुरे , यशवंत नामदेव शिरसट , महेश साळुंखे , आदी
बहुसंख्य ग्रामस्थ , विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा