प्रतिनिधी - संतोष कदम.
इंदापूर :- अखिल भारतीय काँग्रेस या पक्षातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या विभागामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा असणारा विभाग म्हणजे ओबीसी सेल या ओबीसी सेलच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी शेटफळ हवेली येथील युवा कार्यकर्ते बापूसाहेब बोराटे यांची निवड आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी,पुणे जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष व पुरंदर-हवेली चे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना नूतन तालुकाध्यक्ष बापूसाहेब बोराटे म्हणाले की आपल्याला समाजकार्याची आवड आहे.मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्षहिता बरोबरच पक्षवाढीसाठी प्रयत्नशील राहू तसेच काॅंग्रेस ओबीसी सेलच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू यापूर्वी त्यांनी इंदापूर तालुका युवक काँग्रेस चे सरचिटणीस पदावरुन काम केले आहे त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवल्याने त्याची दखल घेत काॅंग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण पक्षाच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करणार असून जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, इंदापूर तालुका काँग्रेस चे कार्याध्यक्ष तानाजी भोंग, जेष्ठ नेते काकासाहेब देवकर, इंदापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष श्रीनिवास शेळके, संतोष शेंडे, बापू व्यवहारे, ॲड नितीन राजगुरू,लखन नरबट, विशाल सावंत, बाळासाहेब सावंत, गणेश कोकरे,जावेद मुलाणी, संतोष जाधव, काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बापूसाहेब बोराटे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा