अजनाळे ते कमलापूर डांबरीकरण रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा; सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणून बसून दुर्लक्ष...
अजनाळे: सचिन धांडोरे: अजनाळे ते कमलापूर डांबरीकरण रस्त्याच्या कामाच्या खड्डे बुजवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा करून ठेकेदार यांनी निकृष्ट दर्जाचे काम केले असून संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अजनाळे गावातील सुज्ञ ग्रामस्थांकडून केली जात आहे. डाळिंबाच्या कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या अजनाळे गावाला जाणार असता खराब झाला असल्याने अजनाळे गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी अर्ज करून अजनाळे ते कमलापूर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दुरुस्तीच्या कामासाठी लाखो रुपये मंजूर करून हा रस्ता ठेकेदारांना दुरुस्ती करण्यासाठी दिला परंतु ठेकेदारांनी डांबर न वापरताच फक्त खडी टाकून रस्ता दुरुस्त केल्यामुळे अवघ्या काही दिवसातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पाहावयास मिळत आहेत ठेकेदार यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून लाखो रुपये आपल्या घशात घातले आहेत. तरी सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी अजनाळे व कमला रस्त्याची पाहणी करून ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावातील ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत