इंदापूर प्रतिनिधी
अंथुर्णे :- ( ता. इंदापूर ) महात्मा फुले कॉलनी ( उखळमाळ ) येथील भूमिपुत्र असलेले ॲड. संजय चंदनशिवे यांची कार्यकारणी सदस्य पदी निवड व संतोष कदम यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल राजगृह बुद्ध विहार समिती व कॉलनी वरील नागरिकांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच संजय वंचाळे ( अंथुर्णे ग्रा.पं ) , दिलीप लोंढे सर, संतोष कांबळे, सुनील केंगार, संजय धिमधिमे, आण्णा तोरणे , अतुल बनसोडे , दत्ता काटे, स्वप्निल धिमधीमे, अनंता कांबळे, विकास खरात, सोमनाथ बनसोडे, अरुण वजीर, प्रकाश धांडोरे, महेंद्र शिवशरण, जालिंदर काटे , चंद्रकांत गायकवाड, सागर काटे आदी उपस्थित होते.
13 जानेवारी 2023 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नीरा - नरसिंहपूर येथे पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी राजकीय, सामाजिक, शासकीय, मान्यवरांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री मा.ना. दत्तात्रय भरणे ( मामा ) यांच्या हस्ते संतोष कदम यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
राष्ट्रीय अधिवक्ता संघाचे सदस्य असणाऱ्या भारतातील 16 राज्यांमधील वकिलांची वर्चुअल मीटिंग राष्ट्रीय अधिवक्ता संघाचे अस्थायी राष्ट्रीय अध्यक्ष इलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील ॲड. अविनाश गौतम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्या मीटिंगमध्ये संघाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात ॲड. संजय चंदनशिवे यांचा अनुभव व सामाजिक कार्याचा विचार करून संघटनेने त्यांच्याकडे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदासह महाराष्ट्र प्रदेश प्रभारी जबाबदारी सोपवली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा