अजनाळे: सचिन धांडोरे:. दि. २० जानेवारी २०२३ रोजी अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून स्कूलच्या सचिवा तसेच मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे मॅडम लाभल्या तर प्रमुख पाहुणे सह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या सचिवा सुवर्णा इंगवले मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत सहशिक्षिका माधुरी पवार यांनी उपस्थित माता पालकांना मकर संक्रांतीचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या सुवर्णा इंगवले यांनी माता-पालकांना मार्गदर्शन करताना,"पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये"असा मोलाचा संदेश दिला.तसेच पालकांनी आपल्या पाल्यासोबत मैत्रीपूर्ण नाते निर्माण करावे असेही सांगितले.त्यानंतर हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला व उपस्थित स्त्रियांना वान देण्यात आला. यानंतर उपस्थित माता पालकांसाठी संगीत खुर्ची खेळाचे आयोजन करण्यात आले होते.या खेळाच्या विजेत्या सुजाता कोळवले व उपविजेत्या राणी लोकरे या ठरल्या यांना स्कूलच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी केले व आभार प्रदर्शन मृणाल पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा