Breaking News

१९ जानेवारी २०२३

युवा भिम सेनेचा वर्धापन दिन व पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.....


 

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

बुधवार दिनांक ११ जानेवारी रोजी सोलापूर रंगभवन येथे युवा भिम सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा  ५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

याप्रसंगी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे ,बाळासाहेब रास्ते ,बंटी गायकवाड ,अनिल सकट ,सुरेश पाटोळे ,नीता बनसोडे, सविता भोसले ,वैशाली डोलारे, सुनील काळे ,विकास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी संघटनेच्या वतीने समाज परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेश अण्णा डोलारे म्हणाले की युवा भिमसेना ही संघटना दीनदलित शोषित पिढीत समाजासाठी काम करत असून कार्यामुळे च संघटनेचे नाव सबंध महाराष्ट्र भर चर्चेत आहे तर काम करीत असताना नुसता सामाजिक संघर्ष करून चालणार नाही तर राजकीय संघर्ष सुद्धा आपणास करावा लागेल अशा प्रकारचे मनोगत त्यांनी व्यक्त केले



 संघटनेमध्ये महाराष्ट्रभर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून व्याप्ती वाढवली आहे आणि पदाधिकाऱ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग यामुळेच आपण आज या ठिकाणापर्यंत पोहोचलो आहे अशा प्रकारचा विश्वास महेश अण्णा डोलारे यांनी व्यक्त केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा