अजनाळे:सचिन धांडोरे: .
अजनाळे गावामध्ये युवांश क्लिनिक सांगोला व विजय दादा उत्पादक सहकारी संस्था यांच्या वतीने काल बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सरपंच सुजाताई देशमुख, उपसरपंच अर्जुन येलपले, सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये वजन, रक्तदाब, गरजेनुसार रक्तातील साखर तपासणी, या शिबिरामध्ये जवळपास २३३ रुग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. याप्रसंगी डॉ यशोदीप गायकवाड, डॉ पूजा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पवार,महादेव भंडगे, अतुल येलपले, संजय येलपले, आरोग्य सेवक डॉ अशोक कलाल, आरोग्य सेविका सिंधू गडदे, आशा वर्कर रंजना येलपले, ज्योती येलपले, पल्लवी धांडोरे, सारिका आवटे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा