सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
सोलापूर जिल्ह्यात जातीय अन्याय अत्याचारत बळी पडलेल्या दोन पीडित कुटूंबाचे #_शासकीय_नोकरी मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आम्हाला यश आले आहे.... आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्रातील एकमेव कृतिशील रिझल्टबेस नेते महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेचे कार्यकर्त्यांचे आशावादी अन्याय अत्याचारच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्याचे मैदान प्राणाची बाजी लावून लढणारे आणि प्रत्येक मैदान जिंकत निघालेले आमचे सर्वेसर्वा मा.#वैभवजी_गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष संजयजी झेंडे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव मा. बाबासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाध्यक्ष पंकजकुमार काटे आणि संघटनेचे पदाधिकारी धनाजी शिवपालक, अनिरुद्ध गायकवाड, येताळा खरबडे, समाधान धांडोरे, रोहित एकमल्ली, दत्ता कांबळे, शशिकांत गडहिरे ,अविनाश ताकतोडे आम्ही गेले अनेक दिवस जिल्हाधिकारी मा. मिलींद शंभरकर समाजकल्याण आयुक्त मा. कैलास आढे यांच्या कडे सोलापूर जिल्ह्यातील 23पीडिताच्या पुनर्वसणासाठी सातत्याने संघर्षशील पाठपुरावा करीत होतो त्यापैकी 2 कुटुंबाना शासकीय नोकरी मिळवून देण्यात आम्हाला यश आले आहे...
दलित पँथरच्या वर्धापन दिनी आमचे नेते मा. वैभवजी गीते साहेब यांनी महाराष्ट्रातील 632खून प्रकरणातील पीडिताची जमीन पेन्शन नोकरी देऊन पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती ही घोषणा सत्यात उतरवण्यासाठी आम्ही #सोलापूर_NDMJ टीम येणाऱ्या काळात गीते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याची टीम सोबत घेऊन उर्वरित 21कुटूंबाचेही जमीन पेन्शन नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन करून दाखऊ... अशी माहिती जिल्हाध्यक्ष पंकज कुमार काटे यांनी दिली या कामाचे जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा