Breaking News

अजंठा आर्ट अँकडमी सांगोला आयोजित राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर हस्ताक्षर स्पर्धेत पायोनियर स्कूलने घवघवीत यश संपादन करुन यशाची पंरपरा कायम जोपासली...


 

अजनाळे: अजंठा आर्ट अँकडमी सांगोलाद्वारा राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केले होते या स्पर्धेमध्ये पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूलने सहभाग नोंदवला होता. शिशुवर्ग ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपला अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये सुंदर हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून यामध्ये कलाभूषण पुरस्कार 2022- 23 हा सन्मान कु पुजा  सुशांत पवार हिने पटकावला शिशु वर्गातील रंगभरण स्पर्धेमध्ये विया संदीप बाबर हिने प्रथम क्रमांक पटकावून पायोनियर इंग्लिश मीडियम चे नाव उज्वल केले आहे स्वाती दुर्योधन खंडागळे हिने रंगभरण स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रतीक्षा दत्तात्रय येलफुले हिने तृतीय क्रमांक पटकावला रंगभरण स्पर्धेमध्ये प्रांजली संतोष हागिर व गौरी अमोल नसले यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले विद्यार्थ्यांना मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या...





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत