सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील पारे येथील कापड दुकानदार बिरा खरात यांनी बेरोजगारीवर मात करत कापड दुकानाचा व्यवसाय सुरू केला होता.शनिवारी मध्यरात्री अचानक लाईटमध्ये बिघाड झाल्याने कापड दुकानातील 15 लाखाचे कापड जळाले आहे. युवा उद्योजक बीरा खरात यांनी कुटुंबाच्या उपजीविकेसाठी कापड दुकान उभे करुन दुकानाच्या माध्यमातून कुटुंबाची उपजीविका करत होते.परंतु 2 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारे लाईट शॉर्टसर्किट झाल्याने कापड दुकानाला आग लागून कापड दुकानातील खरात यांचे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कापड दुकान जळाल्याने याचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी हा कापड दुकानाचा व्यवसाय विविध बँकांचे कर्ज घेऊन उभा केला होता. त्यामुळे या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.यामुळे प्रशासनाने तात्काळ या कुटुंबाला मदत करणे गरजेचे आहे.
मेंढपाळ व्यवसाय करून जगणारा समाज आज कुठेतरी सावरत असताना,अशा स्वरूपाचे नुकसान झाल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.कुठेतरी मेंढपाळ समाजातील युवक उद्योगांमध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न करत असताना नुकसान झाल्याने त्यांचे खच्चीकरण झाले आहे .यामुळे विविध क्षेत्रातील नामवंत, दानशूर उद्योगपती,संस्था, राजकीय पुढारी व समाजसेवकांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे.याबाबत महसूल यंत्रणेने पंचनामा ही केलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा