Breaking News

२७ नोव्हेंबर २०२२

26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विकास विद्यालय व जुनिअर कॉलेज अजनाळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.....


 

अजनाळे प्रतिनिधी:


काल शनिवार दि 26 नोव्हेंबर संविधान दिन रोजी विकास विद्यालय व जुनिअर कॉलेज अजनाळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षकवृंद यांनी अजनाळे येथे संविधानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता पायी संविधान यात्रेचे आयोजन करण्यात आले या संविधान यात्रेमध्ये घोषणा व पोस्टरद्वारे संविधान जागृती करत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या समोर संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले



या कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने हजेरी लावली

विकास विद्यालय आणि जुनियर कॉलेज अजनाळे चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद दादा येलपले, ज्येष्ठ नागरिक धर्मराज कोळवले , आरोग्य सेवक अशोक कलाल ,पोलीस पाटील संतोष भंडगे, किसन चव्हाण चंद्रकांत कोळवले , मुख्याध्यापक श्री शामराव कोळवले आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते


त्यानंतर प्रशालेच्या पटांगणामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व संविधानावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले



 यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक श्री शामराव कोळवले आणि सहशिक्षक आप्पाराव धांडोरे ,रमेश येलपले, सिंधू कोळवले, भिवा बोरकर ,सुहास गुरव , के पी देशमुख,  बाळासो लाडे, नंदकुमार कोळवले, पाटील मॅडम ,लवटे सर, सपाटे सर ,शशिकांत दिक्षित ,शंकर कोळवले, सचिन ढोणे इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री रमेश येलपले  यांनी केले आणि संविधान उद्देशिका वाचन श्री आप्पाराव धांडोरे यांनी केले आणि संविधानाचे महत्त्व त्यांनी सर्वांना पटवून सांगितले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा