Breaking News

२७ नोव्हेंबर २०२२

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा......


 

अजनाळे :प्रतिनिधी:


अजनाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने 26 नोव्हेंबर संविधान दिन हा अगदी मोठ्या उत्साहाने साजरा केला शासन निर्णयानुसार या शाळेने संविधान जागृती करत भारतीय संविधान हे अगदी तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे त्याचे महत्त्व समजले पाहिजे या उद्देशाने राज्यघटनेतील कलमांची ठळक पोस्टर्स, संविधानाचे स्लोगन ,आणि घोषणा देत अजनाळे गावठाण भागातून संविधान यात्रा काढली



 चिमुकल्यांच्या घोषणांनी गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर प्रशालेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवनावर आणि संविधानावर श्री एकनाथ गुरव यांनी विद्यार्थ्यांना महत्व सांगितले आणि संविधान उद्देशिकेचे वाचन केले या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब ऐवळे, सहशिक्षक दाजीशेंबडे,

सहशिक्षक एकनाथ गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा