Breaking News

०७ ऑक्टोबर २०२२

कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रकल्प योजना साठी सहकार्य केले जाईल: तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे


 

अजनाळे:सचिन धांडोरे:  शेतकरी एकत्रित आल्यामुळे शेतकऱ्यांना याचे अनेक फायदे होणार आहेत शेतकरी संघटित झाला तर व्यापारी वर्गाला झुकवू शकतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुम्ही मालविक्री करून एक वेगळे नाव कमवा सांगोला कृषी विभागामार्फत सर्व प्रकल्प आणि योजना साठी पूर्ण सहकार्य केले जाईल असा विश्वास सांगोला तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.काल बुधवार दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी   दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सांगोला अनारकिंग कंपनीच्या ऑफिसचे व  शेतकरी ग्रंथालयाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे,  जयप्रकाश कुलकर्णी,सीईओ सिम्याँसिस  निनाद पानसे, वरिष्ठ क्षेत्र अधिकारी नाफेड नरेंद्र पाटील , यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विक्रम सिंह निंबाळकर, बाळासाहेब सावंत, विवेक पाटील, खांडेकर साहेब, ओंकार कोळवले, कैलास कुरे, समाधान बाड, तानाजी मिसाळ, आनंदराव मिसाळ, बाळासो मिसाळ, बिबीशन मिसाळ, यांच्यासह अन्य मान्यवर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते. पुढे बोलताना शिवाजी शिंदे म्हणाले की, सांगोला अनारकिंग फेड फार्मर प्रोड्युसर या ग्रुप तर्फे या भागातील शेतकऱ्यांना याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांनी सामूहिक शेती केली पाहिजे तरच येथून पुढच्या काळामध्ये शेतकरी उत्पादनाच्या बाबतीत यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही. जयप्रकाश कुलकर्णी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, सकाळ अँग्रोवन आणी नाफेड यांच्यातर्फे  सांगोला अनार किंग या कंपनीला सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.८० वेगवेगळ्या लाईन्स काढून दिल्या जाणार आहेत. तसेच शेतकरी बांधवांना कृषी यांत्रिकीकरण करण्यासाठी लागणारे सगळे मदत निश्चितपणे केले जाईल.    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन डॉ नवनाथ मिसाळ, अरुण शेंबडे, वैभव शितोळे, प्रदीप जाधव, विठ्ठल कुल्हाळ यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाला सभासद शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पाटील सर यांनी केले तर  सूत्रसंचालन व आभार महोन मिसाळ  सर यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा