अजनाळे येथे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा...
अजनाळे:अजनाळे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्यावतिने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण समाज कल्याण माजी सभापती संगम धांडोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी अप्पाराव धांडोरे सर,समाधान धांडोरे, चंद्रकांत चंदनशिवे, सुदर्शन वाघमारे, सचिन धांडोरे, युवराज ठोकळे, उद्धव धांडोरे,प्रमोद धांडोरे, मंथन धांडोरे, यश धांडोरे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत