अजनाळे:सचिन धांडोरे:
नीट (NEET)परीक्षेत अजनाळे येथील सागर अरविंद लाडे या विद्यार्थ्याने ६०५ गुण मिळवून व NTSE मधुन ऑल इंडिया मधून ८१ वा नंबर मिळवुन घवघवीत यश संपादन केले आहे. पुढील वैद्यकीय एमबीबीएस शिक्षणासाठी गव्हरमेंट कॉलेज या ठिकाणी प्रवेश मिळाला आहे. सागर चे पाचवी ते दाहावी पर्यंतचे शिक्षण विकास विद्यालय अजनाळे,तर महाविद्यालयान शिक्षण अकरावी-बारावी लिगाडे काँलेज कराड या ठिकाणी झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले,प्रा हणमंत कोळवले, विष्णू देशमुख,वामन लाडे,राणी कोळवले,सरपंच सुजाता देशमुख यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा