अजनाळे :समाधान धांडोरे
डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा अनावरण सोहळा बुधवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात अजनाळे येथे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख,रिपाई नेते माजी नगरसेवक सुरज दादा बनसोडे आणि मारुती( आबा) बनकर यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी शेतकरी कामगार पक्षातील नेते मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली
तसेच या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष आणि सांगोला माजी नगरसेवक सुरज दादा बनसोडे आणि कमलापूरचे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते पप्पू ऐवळे उपस्थित होते
या उद्घाटनानंतर रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल डॉ बाबासाहेब देशमुख यांचा जाहीर नागरी सत्कार प्रल्हाद येलपले, मारुती पाटील, सदाशिव येलपले यांच्या शुभहस्ते करण्यात आला या सत्कारानंतर गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्या शासकीय कर्मचारी ,शिक्षक वर्ग ,खेळाडू,अंगणवाडी सेविका ,पत्रकार बंधू यांचा सन्मान सोहळा डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत, डॉ बाबासाहेबांनी भारताला सर्वश्रेष्ठ असे संविधान दिले आहे असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सत्काराचे उत्तर देताना व्यक्त केले . अजनाळे परिसरातील डाळिंबाच्या बागा नष्ट झाल्यामुळे अजनाळे येथील शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट झाली आहे त्यांना शेतीमध्ये पुन्हा भरभराटी होवो आणि डाळिंबाच्या बागा पूर्ववत व्हाव्यात आणि माझा शेतकरी राजा सुखी आणि समृद्ध व्हावा यासाठी अंबामातेच्या चरणी प्रार्थना केली.
यावेळी शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
त्यानंतर रिपाईचे नेते सुरजदादा बनसोडे यांनी आपल्या भाषणामध्ये आबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या कार्याचा वसा हे डॉ बाबासाहेब देशमुख नक्कीच पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला त्यापुढे बोलताना ते म्हणाले दीनदलित ,वंचित, बहुजन समाज हा नेहमीच आबासाहेबांच्या पाठीमागे होता आणि यापुढेही राहील यासाठी डॉ बाबासाहेबांनी या वर्गासाठी विशेष लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले . या कार्यक्रम प्रसंगी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, दादाशेठ बाबर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, समाज कल्याण सभापती संगीताबाई धांडोरे,सरपंच सुजाता देशमुख, विष्णू देशमुख, दिपक गोडसे, संगम धांडोरे, प्रल्हाद (दादा) येलपले, मारुती पाटील, हमुनाना येलपले ,उल्हास धायगुडे, परमेश्वर कोळेकर, केतन शेळके, ज्ञानेश्वर इमडे, शेखर गडहिरे, नानासो बंडगर, उपसरपंच मोहीम वसंत रुपनर, शेखर बंडगर, पोपट गडदे, बाळासाहेब पाटील, नवनाथ येडगे, हरी येडगे, शंकर पाटील, चंद्रकांत सरतापे, नवनाथ बंडगर, रफिक तांबोळी, मारुती सरगर, श्रीमंत सरगर, मनोज ढोबळे, वैभव केदार, रमेश अनुसे, चंचल बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, सिद्राम बोडरे, शामराव बोडरे, अजित मोरे, सचिन शिंगाडे, नवनाथ शिंगाडे, घुटुकडे सर, किसन माने सर पांडुरंग लवटे संजय शिंगाडे सर कामाजी नायकुडे सर ,नागेश विचुकले, आप्पा शेजाळ, बंडू शिंगाडे, डॉ मारुती घोगरे, अंकुश जानकर, प्रकाश पाटील, सुदाम चोरमले आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हे विकास विद्यालयाचे सहशिक्षक आप्पाराव धांडोरे सर यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा