Breaking News
२६ सप्टेंबर २०२२
सांगोला पोलिसांनी पाणबुडी, इलेक्ट्रिक मोटर, चोऱ्या करणारे व मोटरसायकल, मोबाईल दुकान फोडून चोरी करणारे केराप्पा उर्फ किरण तानाजी सरगर व अजय लहू कांबळे. या दोन गुन्हेगारांना सांगोला पोलिसांनी जेल बंद करून ६ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून गुन्ह्यातील ८९००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात सांगोला पोलिसांना यश; दोन आरोपींचा शोध सुरू...
अजनाळे: सचिन धांडोरे : दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी ते दिनांक 4 सप्टेंबर रोजी दहाच्या दरम्यान फिर्यादी सतीश शंकर मदने राहणार नरुटे वस्ती सांगोला तालुका सांगोला यांचे शेतातील विहिरी वरून एक सिकोन कंपनीची ३ HP इलेक्ट्रिक पाणबुडी मोटर व काळ्या रंगाची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरले बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सो मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांनी व पोलीस निरीक्षक सो सांगोला पोलीस ठाणे हद्दीत पाणबुडे मोटार चोऱ्या वाढत असल्याने एक तपास पथक तयार करून गोपनीय खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरून गेलेल्या मालाचा व आरोपीचा शोध घेतला असता दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री ७ सुमारास गोपनीय माहिती मिळाली की, चिंचोली तालुका सांगोला येथील एक इसम जुन्या पाणबुडी मोटर विकत असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने सदर इसमांचा नेमलेल्या पथकामार्फत शोध घेतला असता त्याने बऱ्याच ठिकाणाहून त्याचे ३ साथीदारांच्या मदतीने पाणबुडी मोटर चोरल्याचे कबुली देऊन दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९ इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार १ HP मोटार १ हिरो कंपनीची मोटरसायकलचे इंजन १ एस टी. पी पाईपचा बंडल हस्तगत करण्यात आलेला आहे तरी सदर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल हा अंदाजे ८९००० रुपये किमतीचा आहे तसेच सदर गुन्ह्यात केराप्पा उर्फ किरण तानाजी सरगर व अजय लहू कांबळे दोघे राहणार चिंचोली तालुका सांगोला या २ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपीचा शोध चालू आहे. तरी सांगोला पोलीस ठाणे कडील एकुण ६ गुन्हे उघडण्यात सांगोला पोलिसांना यश आलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री हिम्मत जाधव सो अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्रीमती राजश्री पाटील मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा पुणे श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल १५४७ दत्ता वजाळे,पोना १६८२ अभिजीत मोहोळकर,पोना १४२५ बाबासाहेब पाटील,पोना ३९५ अभिजीत साळुंखे,पोना १७८१ गणेश मेटकरी ,पोना १४८ सुनील मोरे व सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस कॉन्स्टेबल २२१६ अन्वर अत्तर यांनी मदत करून गुन्हा उघडकिस आणला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा