Breaking News

२९ सप्टेंबर २०२२

लम्पी च्या प्रतिबंधासाठी आजनाळे गावात १ हजार लसीकरण; पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम...

 


अजनाळे: सचिन धांडोरे:    लम्पी स्कीन आजाराचा  आजनाळे गावात संसर्ग होऊ नये  पशुसंवर्धन विभाग अजनाळे यांच्याकडून खबरदारीचा उपाय म्हणून आज १ हजार लस उपलब्ध करून पशुपालक शेतकरी यांच्या घरोघरी जाऊन ही लस दिली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ एन.बी होनराव यांनी दिली. सांगोला तालुक्यात लम्पी स्किन आजार असलेले जनावरे आढळून आल्याने अजनाळे गावात जोखमीची उपयोजना म्हणून पशुसंवर्धन विभागाने लस उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लसीकरण केल्यामुळे शेतकरी बांधवाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.ही लसीकरण मोहिम बारा  डॉक्टरांच्या साह्याने यशस्वी करण्यात आली आहे. ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ दिलीप गोतसुर्य, डॉ रोहन घोडके,डॉ मासाळ,डॉ अभिजित होवाळ, डॉ सत्यवान तंडे,डॉ सूर्यकांत धांडोरे,डॉ हेमंंत चव्हाण, डॉ प्रथमेश जगताप,डॉ राहुल येलपले,डॉ विकास कोळवले, डॉ विकास चोरमले,डॉ सचिन कोळेकर परिचारक मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले...



 : *लम्पी स्कीन  आजारांच्या जनावरापासून चांगली जनावरे ही दूरच ठेवावित या आजारामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.लम्पी सदृश्य जनावर आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागास कळवावे*.डॉ दिलीप गोतसुर्य...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा