अजनाळे:सचिन धांडोरे: स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या कृपा आशीर्वादामुळे मला विविध पदावरती काम करण्याची संधी मिळाली. ज्या महामानवाने देशाला चांगली अशी राज्यघटना दिली अशा महापुरषाचे स्मारक अजनाळे ग्रामपंचायतीने गावात सुसज्ज असे उद्यान गावात उभा केल्यामुळे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे असे मत पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. काल बुधवार दि २८ सप्टेंबर रोजी अजनाळे ता सांगोला येथे विश्वभूषण पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान लोकार्पण सोहळा व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी ते आपले विचार व्यक्त करत होते. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मारूती आबा बनकर, सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे,दादा बाबर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे,आरपीआय नेते सुरजदादा बनसोडे, समाज कल्याण सभापती संगिताताई धांडोरे, सरपंच सुजाताई देशमुख, प्रल्हाद येलपले, विष्णू देशमुख,संगम धांडोरे, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष दीपक गोडसे , पंचायत समिती सदस्य सिताराम सरगर,डॉ अशोक कलाल, समाधान धांडोरे, हनुमंत येलपले, सचिन धांडोरे, चंद्रकांत चंदनशिवे उल्हास धायगुडे, परमेश्वर कोळेकर, केतन शेळके, ज्ञानेश्वर इमडे, , नानासो बंडगर, उपसरपंच मोहीम वसंत रुपनर, शेखर बंडगर, पोपट गडदे, बाळासाहेब पाटील, नवनाथ येडगे, हरी येडगे, शंकर पाटील, चंद्रकांत सरतापे, नवनाथ बंडगर, रफिक तांबोळी, मारुती सरगर, श्रीमंत सरगर, मनोज ढोबळे, वैभव केदार, रमेश अनुसे, चंचल बनसोडे, बाळासाहेब बनसोडे, सिद्राम बोडरे, शामराव बोडरे, अजित मोरे, सचिन शिंगाडे, नवनाथ शिंगाडे, घुटुकडे सर, किसन माने सर पांडुरंग लवटे संजय शिंगाडे सर कामाजी नायकुडे सर ,नागेश विचुकले, आप्पा शेजाळ, बंडू शिंगाडे, डॉ मारुती घोगरे, अंकुश जानकर, प्रकाश पाटील, सुदाम चोरमले यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब देशमुख पुढे बोलताना म्हणाले की,अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे सेवा दिली. स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख व बाईसाहेब यांच्या कृपा आशीर्वादामुळे मला रयत सारख्या शिक्षण संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे हा माझा सन्मान असून तो आपल्या सर्वांचा सन्मान आहे. अजनाळे गावाने डाळिंब पिकाने आपल्या गावाचे नाव प्रसिद्ध केले आज ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केला ते गुणवंत विद्यार्थी निश्चितपणे आपल्या गावाचे नाव उज्वल करतील. या कार्यक्रम प्रसंगी नानासाहेब लिगाडे, सुरजदादा बनसोडे, प्रशांत शिवशरण यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आप्पाराव धांडोरे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित शेंबडे,योगेश देशमुख, सागर देशमुख, सुदर्शन वाघमारे, निलेश देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा