Breaking News

२५ सप्टेंबर २०२२

सांगोला तालुका केमिस्ट असोसिएशनचे चे नूतन शहर अध्यक्ष सिताराम महिमकर यांचे मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे अन्नधान्य व खाऊ वाटप ...

सांगोला गौरव न्यूज नेटवर्क : सचिन धांडोरे

सांगोला :जागतिक फार्मासिस्ट डे निमित्त सांगोला तालुका केमिस्ट असोसिएशनचे नूतन शहर अध्यक्ष श्री.सिताराम महिमकर व अन्य युवा केमिस्ट यांच्यातर्फे "मातोश्री वृद्धाश्रम सांगोला" येथे अन्नधान्य व खाऊ वाटप करण्यात आले .यावेळी मातोश्री वृद्धाश्रम सांगोला चे चालक श्री. राहुल जाधव यांनी सर्व माहिती समजावून सांगितली.ज्या व्यक्तीला कोणी वारस नाहीत अशा लोकांचे संगोपन या ठिकाणी केले जाते.कशा प्रकारे वयस्कर व्यक्तींची काळजी घेतली जाते, कसा आहार दिला जातो याची माहिती दिली.तसेच त्यांनी सर्व केमिस्ट बांधवांचे मनापासून आभार ही मानले. यावेळी सांगोला तालुका केमिस्ट असोसिएशनचे शहर अध्यक्ष सीताराम महिमकर,योगेश गुरव,राहुल ताटे,प्रदीप तरंगे,गणेश किरगत,फारुख तांबोळी,आरमान तांबोळी, ज्ञानेश्वर आदलिंगे,विशाल हंबीरराव,मयुरेश तोडकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा