Breaking News

आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार अजनाळे येथील पुष्पा येलपले यांना प्रधान...

अजनाळे:सचिन धांडोरे: २०२०-२१ या कोरोना आपत्ती काळात एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्षेत्रात कोरोना योद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषद यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार अजनाळे ता सांगोला येथिल पुष्पा येलपले यांना सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते देण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष जिल्हा परिषद अनिरुद्ध कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद सोलापुर स्वाती शटगार,असल्मा अत्तार, विस्तार अधिकारी टकले, सुपरवायझर जाधव एस के,शेटे मँडम, वाघमारे मॅडम,जंबेनाळ मँडम, शर्मा सर यांच्यासह महिला बालकल्याण विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी अंगणवाडी मदतनीस मोठ्या संख्येने हजर होते. अतिशय प्रामाणिकपणे अजनाळे( देशमुख वस्ती) अंगणवाडीमध्ये सेवा केल्याबद्दल व कोरोना काळात चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद सोलापूर यांनी पुष्पा येलपले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच सुजाता ताई देशमुख, सारिका सावंत, सुरेखा येलपले, विष्णू देशमुख, पत्रकार सचिन धांडोरे, ग्रामसेवक संदीप सरगर, यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर त्यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.फोटो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत