Breaking News

१५ सप्टेंबर २०२२

पंधरा दिवसात दिवसात प्रश्न मार्गी लावू असे ठोस आश्वासन गट विकास अधिकारी यानी दिल्यानंतर आंदोलन स्थगित; महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते आक्रमक..


अजनाळे: सचिन धांडोरे: 

   २०१८-२०१९ या वर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चे बिल अजून न मिळाल्याने टँकर मलकांच्यावर आर्थिक संकट ओढवले त्या वेळी त्यांनी सांगोला विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला असता  त्यांनी दिनांक 15/09/2022 या रोजी तहसीलदार कार्यालय सांगोला या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले तेंव्हा गट विकास अधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांनी याची चौकशी करू या साठी आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ द्या आपण तुमचा प्रश्न मार्गी लावू असे आव्हान केले तस लेखी स्वरूपात दिले त्यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनसे विधान सभा अध्यक्ष अक्षय विभुते यांनी तुमच्या शब्दाला मान देत या आंदोलनाला आम्ही तात्पुरती स्थगिती देत आहे असे सांगत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर या पुढचे आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा दिला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते, तालुका अध्यक्ष अनिल केदार, तालुका संघटक विशाल गोडसे,शहर अध्यक्ष अजिंक्य तोडकरी,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बनसोडे,मनसे शेतकरी सेना बाबासाहेब लिगाडे,सहकार सेना तालुका अध्यक्ष रामचंद्र सरगर संकेत,सरगर बाबा आलदर, टँकर मालक आप्पा मोरे,पिटु उबाळे,पिटु करांडे, उत्तम काळेल चाँद मुलाणी,व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा