अजनाळे:अजनाळे ता सांगोला येथिल श्वेता दत्तात्रय देशमुख हीचे काल गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने सांगली येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे. निधना समयी तिचे वय ११ वर्ष इतके होते. न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज सांगोला येथिल प्रा दत्तात्रय देशमुख यांची कन्या होती.तिचा स्वभाव शांत व मनमिळावु होता तिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवार दि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता अजनाळे येथिल स्मशानभुमित होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा