Breaking News

१७ सप्टेंबर २०२२

अजनाळे येथिल धर्मराज कोळवले यांची दोडक्याची शेती ठरते लाभदायी; दोडक्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न...

अजनाळे:सचिन धांडोरे: 

डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून जगभरात नावलौकिक मिळवलेल्या डाळिंब उत्पन्नाच्या बाबतीत अनेक विक्रम करत  क्रांती केलेल्या सांगोला तालुक्यातील अजनाळे येथिल पेशाने शिक्षक असलेले धर्मराज कोळवले व पत्नी सोनल कोळवले या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगळे प्रयोग करीत आपल्या १ एकर शेतात नागा वाण असलेली दोडक्याची लागवड केली आहे. यातून ते दररोज भरघोस उत्पन्न घेत लाखो रू उत्पन्न मिळवले आहे.       त्यांचा हा प्रयोग अजनाळे गावातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे. अलीकडच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये नुकसान होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे  मात्र शेतीत थोडे वेगळे प्रयोग केले तर निश्चित असे उत्पन्न मिळू शकते हे धर्मराज कोळवले यांनी दाखवून दिले आहे. धर्मराज कोळवले यांची अजनाळे गावात १७ एकर शेती आहे  सध्या शेतीमध्ये डाळिंब,सिमला मिरची,दोडका, ज्वारी, बाजरी याच्यासह शेतीत धर्मराज कोळवले व सोनल कोळवले ते नवनवीन प्रयोग करत असतात नागा दोडका  बी टोकण त्यांचा प्रयोग शेतकऱ्यांना चालना देणारा ठरला आहे दोन सरीमध्ये ८ फुट अंतर व दोन बियांमध्ये २ फुट अंतर ठेवून दोडका लागवड करण्यात आला आहे. सध्या प्रत्येक तोडणीस ३० रू ते ५० रू बाजार भाव मिळाल्याने लाखो रुपये चा फायदा झाला आहे.      १ एकर शेतीत ड्रिपच्या साह्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने त्याने दोडक्याची लागवड केली आहे. डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून संपूर्ण देशभर ओळख असलेल्या अजनाळे गावात डाळिंब पिक हे विविध रोगाने ग्रासल्यामुळे डाळिंबाची शेती संपुष्टात आली आहे. डाळिंबाच्या शेतीवरच अवलंबून न राहता धर्मराज कोळवले यांनी सध्या बाजारामध्ये दोडक्याला चांगली मागणी असल्याने नागा वाणाची दोडक्याची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.       




मांडव :पद्धतपारंपारिक पद्धतीपेक्षा सुधारित पद्धतीमुळे कमी पाण्यात उत्पन्नात वाढ मिळते मांडव केल्यामुळे फळांना माती लागत नाही फळ निरोगी आणि लांबट राहते दोन ओळीतील अंतर जास्त असल्यामुळे यंत्राच्या साह्याने अंतर मशागत करणे अगदी सुलभ होते मंडप असल्यामुळे सूर्यप्रकाश जास्त मिळतो त्यामुळे फळांची प्रत सुधारते वेळेवर कीटकनाशक अथवा बुरशीनाशकाची फवारणी करणे सुलभ होते उत्पन्नात चांगली वाढ होते आणि फळांची तोडणी करणे अतिशय सोयस्कर होत असल्याचे धर्मराज कोळवले यांनी सांगितले.


मल्चिंग पेपर :दोडक्याचे पीक घेण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करून बी टोकन पद्धतीने दोडक्याची लागवड केली आहे पाऊस आणि पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्राचा फायदा होत आहे. 

======================================

चौकट : डाळिंबापासून हमखास उत्पादन लाखो रुपये उत्पादन मिळत होते परंतु  गेल्या एक-दोन वर्षापासून डाळिंब पिकावर तेल्या, मर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे डाळिंबाच्या बागा नष्ट झाल्या आहेत त्यामुळे शेतीमध्ये प्रयोग करत दोडक्याच्या शेतीमधून ३० ते ५० रू बाजार भाव मिळाल्याने आम्हाला लाखो रुपयाचा फायदा झाला आहे. प्रगतशील शेतकरी : धर्मराज कोळवले अजनाळे

======================================



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा