अजनाळे: समाधान धांडोरे
नीट (NEET) परिक्षेत सागर अरविंद लाडे यांनी ६०५ गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल व ओम वामन लाडे (NMMS) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत १०५ गुण मिळवुन EWS गटातून सोलापूर जिल्ह्यात 33 वा क्रमांक पटकवल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे -पाटील यांच्यावतीने शाल श्रीफळ हार फेटा बांधून आज रविवार दि २५ सप्टेंबर रोजी वामन लाडे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक विजय दादा येलपले अजनाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुन कोळवले विद्यमान उपसरपंच अर्जुन येलपले ,प्रगतशील बागायतदार महादेव लाडे ,शरद येलपले अशोक लाडे , मधुकर लाडे, धर्मराज लाडे ,सुरेश धांडोरे , लक्ष्मण पाटील, वामन लाडे,अरविंद लाडे, यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा