Breaking News

अमित वाघमारे यांना उत्कृष्ट अभियंता २०२२ पुरस्कार प्रदान....


 

अजनाळे: समाधान धांडोरे

दिघंची ता आटपाडी गावचे सुपुत्र अमित भारत वाघमारे यांना 2022 चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन काल शुक्रवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी जतचे लोकप्रिय आमदार विक्रम सिंह सावंत व मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी खासदार संजय काका पाटील,आमदार अनिल (भाऊ) बाबर, पदवीधर आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद सांगली, सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली चे सर्व अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. अमित वाघमारे यांना आटपाडी तालुक्यातून एकमेव पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत