Breaking News

०१ सप्टेंबर २०२२

सांगोला येथे डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख युवा मंचच्या वतीने घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा २०२२ चे आयोजन

सांगोला /विकास गंगणे मो.9881583935 सांगोला तालुक्यात गणेशोत्सवानिमित्त मा. डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख युवा मंच सांगोला यांच्या वतीने घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा २०२२ आयोजित केली आहे.मुर्ती, सजावट, सामाजिक संदेश (थीम) विषयांवर अनुसरुन प्रत्येक श्रेणीत तीन बक्षिस दिली जाणार असल्याची माहिती मा. डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख युवा मंचच्या वतीने देण्यात आली आहे. मागील दोन वर्ष कोरोनासारखे जगातील मोठे संकट उभे राहिल्याने उत्सव अतिशय साध्या पध्दतीने पार पडले त्या. परंतु यावर्षी गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे . गणेश उत्सवातील हा उत्साह आणखी द्विगुणित व्हावा म्हणून मा. डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख युवा मंच सांगोला यांच्या वतीने घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा २०२२ आयोजित केली आहे . या स्पर्धेमध्ये घरगुती बरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांचाही सहभाग असेल. मुर्ती, सजावट, सामाजिक संदेश (थीम) या विषयांवर अनुसरुन प्रत्येक श्रेणीत तीन बक्षिस दिली जाणार आहेत. प्रत्येक विषयावर प्रत्येकी तीन याप्रमाणे नऊ बक्षिसे असतील. प्रथम क्रमांक श्रेणीसाठी चांदीची गणपती मूर्ती व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक श्रेणीसाठी डीनर सेट व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक श्रेणीसाठी भिंतीवरील घड्याळ व सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे. सदरच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण समारोह सांगोला तालुका शेकापचे नेते युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख यांचे वाढदिवसाच्या कार्यक्रमांत मान्यवरांचे शुभ हस्ते होणार आहे. तरी आपल्या सजावटीचा फोटो काढुन आपले नांव व पत्ता 9665856019, 9146244141, 7709469606 9423964141, 9922271534, 9766692041 या नंबर वरती व्हॉटसॅप करावे असे आवाहन मा. डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा