Breaking News

०३ सप्टेंबर २०२२

धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य मोदक स्पर्धेचे आयोजन

सांगोला शहर प्रतिनिधी शब्बीर मुलाणी मो.9403182020 (सांगोला) धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त बुधवार दि. 07 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 ते 4 वा. भव्य मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली. सदरच्या स्पर्धा ह्या अहिल्यानगर गणेश मंडळ या ठिकाणी पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस हे ऑदर राईस कुकर असून द्वितीय बक्षीस नॉन-स्टिक हाकिन्स कूकर (ब्लॅक 2 ली.) तर तृतीय बक्षीस सँडविच मेकर (केनस्टार) आणि उत्तेजनार्थ बक्षीस केटल मेकॉय निओ अशा प्रकारची बक्षिसे आहेत. सदर स्पर्धेसाठी नियम व अटी असून यामध्ये तांदळाच्या पिठाचे मोदक, उकडीचे मोदक असावेत, सजावट खाद्य पदार्थांपासून करावी, पाने फुलांची सजावट चालणार नाही, स्पर्धा वेळेवर चालू होतील, स्पर्धेसाठी एक तास (सजावटी) वेळ असेल अशा प्रकारचे नियम व अटी आहेत. स्पर्धेसाठी नाव नोंदणी आवश्यक असून रुपाली मदने- 7741054289, छायाताई मेटकरी- 9049060936, मीनाक्षी गडदे- 7066347875 यांच्याकडे करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा