Breaking News

०६ सप्टेंबर २०२२

सांगोला तालुक्यात सन 2018 -2019 मध्ये टँकर ने केलेल्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार? संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्याची मनसेचे विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते यांची मागणी...

सांगोला: प्रतिनिधी:
2018-19 यावर्षी सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागांना टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदार व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा कोट्यावधीचा घोटाळा उघडकीस आला आहे. सविस्त मलार वृत्त पुढील प्रमाणे, 2018-19 यावर्षी सांगोला तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. हा पाणीपुरवठा करण्याचे कॉन्ट्रॅक्ट बबनरावजी शिंदे सह मोटार वाहतूक संस्था मर्या माढा यांना मिळाले होते. यांनी सांगोल तालुक्यातील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्या चा ठेका आपले निकटवर्तीय सहठेकेदार नंदकुमार दुर्योधन यादव शेतकरी कामगार पक्षाचे नेते यांना दिला होता. यांच्या मार्फत तालुक्यात 70-80 टँकर पाणी पुरवठा करण्याचे काम करत होते. परंतु इतकी वर्ष होऊनही त्यांची लाखो रुपयांची बिले अजूनही दिले नसल्याचे संबंधित टँकर चालकांनी प्रथम बळीराजा शेतकरी संघटना व सांगोला तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला.तसेच सांगोला ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनाही तक्रार अर्ज दाखल केला होता. यावर तहसीलदारांसह सगळ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सांगोला पाणी पुरवठा अधिकारी सुरेश कमळे व अमोल नवले यांनी संबंधित ठेकेदाराकडून विशिष्ट रक्कम घेऊन खोटी बिले तयार करून यावर सह्या करून सरकारच्या तिजोरीवर लाखो रुपयांचा डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. यामध्ये टँकर चालक आप्पा धोंडीराम मोरे यांचा टॅंकर1/8/2019 ते 14/10/2019 यादरम्यान यांच्या टॅंकरने पाणीपुरवठा झाला नसतानाही त्यांच्या नावे नकली कागदपत्रे बनवून अमोल नवले व कळमे पाणी पुरवठा अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराची संगणमत करून माझ्या नावे बोगस बिल काढले ची माहिती टँकर चालक आप्पा धोंडीराम मोरे यांनी दिली आहे. अनेक टँकर चालकांची बिले न देता बबनराव शिंदे, व सह ठेकेदार नंदकुमार दुर्योधन यादव यांच्यासह सांगोला ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी सुरेश कमळे व अमोल नवले यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. तालुक्यात कोणताही अधिकारी अथवा राजकीय पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने संबंधित टँकरचालक यांनी मनसे सांगोला तालुका अध्यक्ष अक्षय विभुते यांच्याकडे 2/7/2022 रोजी अर्ज दाखल केला. यानुसार माहिती अधिकार कायद्यानुसार संबंधित कार्यालयाकडून माहिती मागवली असता काढलेल्या बिलामध्ये मोठी अफरातफर झाल्याचे दिसून आले. यासंबंधी अक्षय विभुते यांनी सांगोला तहसीलदारांना 3/8/2022 रोजी अर्ज दिला असून त्यांची चौकशी न झाल्यास त्यानंतरटँकर चालकांच्या वतीने धरणे आंदोलन तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक15/9/2022 रोजी करण्याचा इशारा दिला आहे. संबंधित प्रकरणात तालुक्यातील राजकीय व्यक्तींसह अनेक अधिकाऱ्यांनी संगणमत करून शासनाच्या तिजोरीवर कोटी रुपयांचा डल्ला मारला तसेच अनेक टँकर चालकांची बिले न देता त्यांच्या पैशावर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. तेव्हा या ठेकेदारांचा संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून शासनाचा पैसा शासनाला परत करावा तसेच टँकर चालकांची बिले अदा करावीत असा अर्ज टँकर चालकांच्या वतीने मनसे तालुका अध्यक्ष अक्षय विभुते यांनी तहसीलदार यांना दिला आहे. यावर लवकर निर्णय न दिल्यास या अधिकारी व ठेकेदारांचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर उघड करत तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा