सांगोला: प्रतिनिधी :
ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील तथा काकी या केवळ माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या माता नसून त्यांनी माझ्यावरही पुत्रवत प्रेम केले. आबा आणि मी कितीही राजकीय मतभेद असले तरी नेहमीच सख्ख्या भावाप्रमाणे राहिलो आहे यापुढील काळातही दिपकआबा म्हणतील तीच माझ्यासाठी पूर्व दिशा असेल किंवा ते सांगतील तीच माझी भूमिका आणि माझा निर्णय असेल माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी कधीच दिपकआबांना अंतर देणार नाही आणि कधीच त्यांना दुखावणार नाही असे भावनिक वचन आम. शहाजीबापू पाटील यांनी स्वर्गीय ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील तथा काकींना दिले.
सांगोला तालुक्याच्या सामाजिक, राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. मंगळवार दि ६ सप्टेंबर रोजी जवळा ता. सांगोला येथे त्यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमात त्यांना श्रद्धांजली वाहताना आमदार शहाजीबापू बोलत होते. यावेळी पंढरपूरचे ज्येष्ठ नेते युवराज पाटील, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, शेकापचे चंद्रकांत देशमुख, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी, दिपक पवार, गणेश पाटील, राजेश भादुले, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, चंदन होनराव, सी पी बागल, मनसेचे दिलीप धोत्रे, माजी नगरसेवक आनंदा माने, माजी सभापती संभाजी आलदर, बाळासाहेब काटकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, अरुण शेंडे, माजी उपसभापती संतोष देवकते, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, राजकुमार पवार, ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, शिवाजी बनकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर, अभिषेक कांबळे, माजी शिक्षण सभापती साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, नवनाथ लवटे, शंकर ढाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, सांगोला सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ चव्हाण, माजी सरपंच प्रकाश केदार, श्री संत बाळूमामा ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब खरात, मनसेचे विनोद बाबर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे, माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे, माजी जिल्हा परिषद सभापती अनिल मोटे, उत्तम खांडेकर, मारुती ढाळे, सतीश वाघ, प्रा. संजय देशमुख, गजानन भाकरे, अनिल इंगवले, गजानन बनकर, भारत बनकर, दत्ता सावंत, गणेश कांबळे, जालिंदर ढेरे, रफिक शेख, बापूसो ठोकळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व सोलापूर जिल्ह्यातील हजारो हितचिंतक व नातेवाईक उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू म्हणाले, स्वर्गीय शारदादेवी साळुंखे पाटील तथा काकींनी संपूर्ण जिल्ह्याला सामाजिक, राजकीय आणि धार्मिक व्यासपीठ निर्माण करून दिले आज त्यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून निघणार नाही सांगोला तालुक्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचा इतिहास लिहिताना काकींच्या कार्याची दखल इतिहासालाही घ्यावी लागेल स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी सुरू केलेल्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा यज्ञ काकींनी पुढे सुरू ठेवला यापुढील काळात मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील हा यज्ञकुंड असाच धगधगता ठेवतील याकामी आपण सदैव आबांच्या सोबत खंबीर पणे उभा राहू असा विश्वासही शेवटी बापूंनी व्यक्त केला.
यावेळी कल्याणराव काळे, दादासाहेब साठे, अनिल सावंत, यशवंत कुलकर्णी, चंद्रकांत देशमुख, राजकुमार पवार, दिलीप धोत्रे, दीपक पवार, गुलाबराव कोडग, सुभाष लऊळकर, शिवाजीराव गायकवाड, सुभाष जाधव, प्रा जयप्रकाश बिले, शिवाजीराव कोळेकर, डॉ बंडगर सर, तानाजी बाबर आदींनी आपले विचार व्यक्त करताना काकींच्या आठवणी जागवल्या व सांगोला तालुक्यात पुन्हा स्व. काकीसारखे व्यक्तिमत्व जन्माला यावे अशी प्रार्थनाही यावेळी सर्वांनी केली.
चौकट ;
१) स्व. काकींचे संस्कार आणि स्व. काकांचा विचार घेऊन पुढे जाणार..!
आपल्या आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरीही स्व. काकींनी कधीही आपल्या विचारांशी आणि आदर्शांशी कधीही तडजोड केली नाही. स्व. काकींनी जी संस्काराची शिदोरी आणि स्वर्गीय काकांनी जो विचारांचा वारसा आपणास दिला आहे तोच यापुढील काळात पुढे घेऊन जाणार आहे. सांगोला तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक विकासासाठी आपण आजन्म बांधील राहू
; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील
२) हजारोंची गर्दी ; अश्रूंचा महापूर..!
संपूर्ण आयुष्य जनसेवेसाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी वाहून घेतलेल्या स्वर्गीय ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अंत्यविधीला व रक्षाविसर्जन कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातून आणि संपूर्ण राज्यभरातून हजारो हितचिंतक व नातेवाईकांनी गर्दी केली. स्व. काकीसोबत असलेल्या आठवणी जागवत असताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. अत्यंत भावनिक वातावरणात आपल्या लाडक्या काकींना अखेरचा निरोप देण्यासाठी जवळा परिसरात अंत्यविधीनंतर मंगळवारी रक्षाविसर्जन कार्यक्रमासही प्रचंड जनसागर लोटला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा