Breaking News

०९ सप्टेंबर २०२२

उद्या 10 सप्टेंबर पासून शनिवार व रविवार सांगोल्यातील जनावरांचा आठवडे बाजार बंद...

सांगोला शहर प्रतिनिधी शब्बीर मुलाणी मो.9403182020
(सांगोला)सर्व पशुपालक शेतकरी व व्यापारी यांना कळविण्यात येते कि, मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापुर यांचे आदेश जा.क्र. आव्यमपु / कार्या/ आरआर /6752 /2022 अन्वये " लम्पी स्किन " (LSD-Lumpy Skin Disease) रोगाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणुन शनिवार रविवार दि. 10/09/2022 पासून पुढील आदेश येईपर्यंत सांगोला कृषि उत्पन्न बाजार समितीचा जनावरे बाजार (गाय, बैल, म्हैस, शेळी मेंढी इ.) बंद राहील याची सर्व शेतकरी व व्यापारी यांनी नोंद घ्यावी तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती सांगोला प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती सांगोला प्र. सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती, यांच्याकडून पशुपालक व शेतकरी यांना आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा